top of page

२१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात 'मदार' या मराठी चित्रपटाने उमटविली मोहोर

पुणे , ९ फेब्रुवारी २०२३ : शहरात गेले आठवडाभर सुरू असलेल्या २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यंदा ' मदार ' या मराठी चित्रपटाने विविध पुरस्कार मिळवित महोत्सवावर आपली मोहोर उमटविली आहे. तर यंदाचा प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार बेल्जियम आणि फ्रान्स येथील 'तोरी अँड लोकिता' या चित्रपटाला प्रदान करण्यात आला.


पुणे फिल्म फाऊंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचा समारोप सोहळा गुरुवारी मुकुंदनगर येथील सकल ललित कलाघर येथे संपन्न झाला. याप्रसंगी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील, अभिनेत्री विद्या बालन, ज्येष्ठ चित्रपट दिग्दर्शक व निर्माते जानू बरवा, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक डॉ अविनाश ढाकणे, पुणे फिल्म फाऊंडेशनचे अध्यक्ष व महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल हे उपस्थित होते.


यावेळी बोलताना सुधीर मुनगुंटीवार म्हणाले, " महाराष्ट्रात नाट्य,सिनेमा, साहित्य या सर्व क्षेत्राला प्रोत्साहन देण्यासाठी राज्य सरकार सर्व शक्तिनिशी कार्यरत आहे. सांस्कृतिक क्षेत्रात महाराष्ट्र जगात १० व्या क्रमांकावर आहे. राज्यातील चित्रपट क्षेत्राच्या प्रगतीसाठी कोल्हापूर येथे नवीन चित्रनगरी उभारण्याबरोबरच राज्य सरकार बॉम्बे स्टॉक एक्सचेंज'च्या आधारावर फिल्म इक्वीटी स्टॉक एक्सचेंज सुरू करणार आहे. त्याचबरोबर चित्रपट निर्मात्यांना माझे आवाहन आहे, की त्यांनी चित्रपटांमध्ये पर्यावरण हा विषय हाताळला जावा, जेणेकरून नागरिकांमध्ये या विषयी जागरूकता निर्माण होईल."


चंद्रकांतदादा पाटील यांनी यावेळी पुण्यात देखील फिल्म सिटी उभारण्यासाठी राज्य सरकारने मदत करावी, अशी मागणी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगुंटीवार यांच्याकडे केली. यासाठी जागेची उपलब्धता करून दिली जाईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले.


अभिनेत्री विद्या बालन म्हणाल्या, " हल्ली अनेक जण मोबाईल, विविध सोशल मीडिया यावर चित्रपट पाहता असतात. त्यामुळे चित्रपट महोत्सवात येऊन ते चित्रपट पाहतील का? असा प्रश्न पडतो. मात्र या पुणे आंतराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाने या प्रश्नांचे अतिशय समर्पक उत्तर दिले आहे. सवाई गंधर्व संगीत महोत्सव असो की चित्रपट महोत्सव असो, पुण्यातील नागरिक त्याला भरभरून प्रतिसाद देतात. हे खरोखरच कौतुकास्पद आहे. "


पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात जाहीर झालेले आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार खालील प्रमाणे :

- प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट पुरस्कार - बेल्जियम आणि फ्रान्स येथील - तोरी अँड लोकिता

- प्रभात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय चित्रपट दिग्दर्शक - मरिना गोर्बाक - क्लोंडिके

- एमआयटी- एसएफटी ह्युमन स्पिरीट - क्लोंडिके

- स्पेशल ज्युरी मेंशन - बॉय फ्रॉम हेवन

- स्पेशल ज्युरी मेंशन अभिनेत्री - लुबना अझबल- ब्ल्यू काफ्तान.


मराठी चित्रपट पुरस्कार :

- महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट - मदार

- अखिल भारतीय चित्रपट महामंडळ सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक' - मंगेश बदर - मदार

- अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेत्री - अमृता अगरवाल - मदार

- अखिल भारतीय चित्रपट महामंडळ उत्कृष्ट अभिनेता - मिलिंद शिंदे - मदार

- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ बेस्ट सिनेमाटोग्राफर - आकाश बनकर आणि अजय बालेराव - मदार

- अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ उत्कृष्ट पटकथा पुरस्कार - राहुल आवटे - पंचक

- स्पेशल मेंशन ज्युरी अवार्ड फॉर आर्ट डायरेक्टर - कुणाल वेदपाठक - डायरी ऑफ विनायक पंडित

- स्पेशल मेंशन ज्युरी टू द डायरेक्टर - कविता दातिर - अमित सोनवणे - गिरकी


---- -------- ------------ -------------

फोटो ओळी –

फोटो १ - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षीचा महाराष्ट्र शासनाचा संत तुकाराम सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय मराठी चित्रपट पुरस्कार ‘मदार’ या चित्रपटाने पटकाविला. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेत्री विद्या बालन आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना चित्रपटाची टीम.

फोटो २ - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षीचा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार ‘मदार’ चित्रपटाचे दिग्दर्शक मंगेश बदर यांनी पटकाविला. यावेळी राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेत्री विद्या बालन आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मंगेश बदर.

फोटो ३ - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षीचा अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार मदार चित्रपटातील अभिनेते मिलिंद शिंदे यांनी पटकाविला. यावेळी ज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेत्री विद्या बालन आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना मिलिंद शिंदे.


फोटो ४ - पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २१ व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात यावर्षीचा कला दिग्दर्शनाचा स्पेशल मेंशन ज्युरी पुरस्कार पुण्याच्या २२ वर्षीय कुणाल वेदपाठक याने पटकाविला. यावेळी सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, अभिनेत्री विद्या बालन आणि महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांच्या हस्ते पुरस्कार स्वीकारताना कुणाल वेदपाठक.


Commentaires

Noté 0 étoile sur 5.
Pas encore de note

Ajouter une note

©2025 Neel Writes | All Rights Reserved

bottom of page