हेरिटेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
- Neel Writes
- Aug 16, 2024
- 1 min read
पिरंगुट : मुळशी येथील कासार आंबोली गावातील हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल मध्ये मोठ्या उत्साहात स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. शाळेमध्ये कार्यक्रमाची सुरुवात सकाळी साडेसात वाजता होऊन सुरवातीस देशभक्तीपर नारे देत प्रभातफेरी काढण्यात आली.
प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले उमेशदादा सुतार,शाळेचे संस्थापक अध्यक्ष कृष्णा भिलारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.सचिव संगीता भिलारे, संचालक कुणाल भिलारे, व्यवस्थापिका यशस्विनी भिलारे , समाजसेवक गणेश भिलारे हे यावेळी उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेमध्ये विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या.त्यामध्ये सर्वांचे लक्ष भाषण स्पर्धा आणि देशासाठी स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या विविध क्रांतिसेनानी यांवर सुंदर नृत्य सादर करणाऱ्या विद्यार्थ्याकडे होते. यामध्ये विद्यार्थ्यांनी राणी लक्ष्मीबाई यांचे चरित्र पर नाटिका तसेच भारत छोडो आंदोलन हे नाटक सादर करत यांच्या जीवनशैलीचा आढावा घेत त्यांचे महत्वपूर्ण कार्य सादर केले.
त्यानंतर कार्यक्रमाला लाभलेले प्रमुख पाहुणे तसेच माजी सरपंच उमेशदादा सुतार, तंटामुक्ती अध्यक्ष शांताराम गिरीगोसावी, सामाजिक कार्यकर्ते स्वप्निल कांबळे आणि मुख्याध्यापिका यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व व स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या स्वातंत्र्यसेनानीचे योगदान याविषयी मार्गदर्शक भाषण देणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हे वर्ग दहावीच्या विद्यार्थिनीने केले.
उपस्थित प्रमुख पाहुणे व मुख्याध्यापिका यांनी विविध स्पर्धेमध्ये जिल्हास्तरीय व राष्ट्रीय स्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कुडो स्पर्धेत विद्यार्थ्यांनी प्राविण् मिळाल्याबद्दल शुभेच्छा व मेडल व प्रशस्तीपत्रक देऊन सत्कार करण्यात आले. तसेच शालेय विद्यार्थी प्रतिनिधी संघ यांना बॅचेस प्रदान करण्यात आले.
आणि सर्वात शेवटी सर्व उपस्थित विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करून आभार प्रदर्शन करण्यात आले व देशभक्तीपर नारे लावून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Comments