हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलमध्ये राखी बनवण्याचा उपक्रम व पौड पोलीस ठाण्यात रक्षाबंधन उत्सव
- Neel Writes
- Aug 21, 2024
- 1 min read
रक्षाबंधन हा भाऊ-बहिणीच्या नात्याला साजरा करणारा सण आहे. हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासारंबोली, पुणे येथील विद्यार्थिनी दरवर्षी पोलीस अधिका-यांसोबत हा उत्सव साजरा करतात पोलीसबांधवांच्या सेवेबद्दल आणि संरक्षणाबद्दल कौतुक करण्याचा एक अनोखा आणि अर्थपूर्ण उपक्रम शाळा करत आहे.
मुली पोलिस अधिकाऱ्यांच्या मनगटावर राख्या बांधतात जे संरक्षण आणि आशीर्वादाचे प्रतीक आहे.पोलीस अधिकाऱ्यांच्या सेवा आणि बलिदानाचा सन्मान करतात. एकता आणि कृतज्ञतेची भावना वाढवण्यासाठी , सामुदायिक प्रतिबद्धता म्हणून शाळा असे क्रियाकलाप आयोजित करते.
मागील 5 वर्षांपासून विद्यार्थीनी राखी उत्सवासाठी पौड पोलीस स्टेशनला भेट देतात हा उपक्रम मुख्याध्यापक डॉ रेणू पाटील यांनी सुरू केला होता कारण या उत्सवामुळे पोलीस अधिकारी आणि ते ज्या समाजाची सेवा करतात त्यांच्यातील बंध दृढ होऊ शकतात.
पोलीस स्टेशनला भेट दिल्याने त्यांना स्टेशन अंतर्गत विविध विभाग तसेच शस्त्रे, एफआयआर कसा नोंदवायचा, कोठडी इत्यादी जाणून घेण्यास मदत होते ज्यामुळे ज्ञानात भर पडते.
हेरिटेजचे व्यवस्थापकीय सदस्य श्री.कृष्णा भिलारे (संस्थापक अध्यक्ष), सौ.संगीता भिलारे (सचिव), श्री.कुणाल भिलारे (संचालक), सौ.यशस्विनी भिलारे यांनी या राखी सोहळ्यासाठी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांच्या या उपक्रमाचे कौतुक केले
Comments