शिवजन्मभूमीतील ओतूर पंचक्रोशीतील सहा साहित्यिकांना प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार प्रदान
- Neel Writes
- Aug 28, 2024
- 1 min read
ओतूर :- रविवार, २५ ऑगस्ट २०२४ रोजी नॅशनल लायब्ररी, बांद्रा येथे आयोजित करण्यात आलेल्या प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळ्यात शिवजन्मभूमीतील ओतूर पंचक्रोशीतील सहा साहित्यिकांचा सन्मान करण्यात आला. महाराष्ट्र राज्य आयोजित या सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिक राजेश साबळे ओतूरकर, राज्यकवी डॉ. खं. र. माळवे यांना प्रजासत्ताक अमृत जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच, वर्ल्ड व्हिजन संस्थेचे संपादक प्रा. नागेश हुलवळे, साहित्यिक डॉ. प्रविण डुंबरे, साहित्यिक रणजित पवार यांना साहित्यरत्न प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. नवोदित कवयित्री युवराज्ञी सोनवणे यांना प्रजासत्ताक अमृत युवा गौरव पुरस्कार प्राप्त झाला आहे.

राजेश साबळे
सदर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. जी. डी. यादव यांच्या शुभ हस्ते या सर्व साहित्यिकांना पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या प्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ साहित्यिक डॉ. बाळासाहेब तोरस्कर उपस्थित होते. उदघाटक म्हणून राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त जेष्ठ साहित्यिक डॉ. खं. र. माळवे यांची उपस्थिती लाभली.

ख. र. माळवे
प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. डेरिक एंजल्स, नासा शास्त्रज्ञ डॉ. सुकृत खांडेकर, संपादक प्रहार भानुदास केसरे, बी. पी. हायस्कूल, बांद्रा चे मुख्याध्यापक प्रमोद महाडिक, सचिव नॅशनल लायब्ररी, बांद्रा चे राजेंद्र कांबळे, वित्त व्यवस्थापक मल्टीनॅशनल कंपनी, मुंबई चे मा. डॉ. नॅन्सी अल्यूकर्क, संस्थापक वुमेन्स इंडिपेंडेस फॉरएव्हर, हे उपस्थित होते.

प्रा. नागेश हुलवळे
या कार्यक्रमाचे आयोजन प्रजासत्ताक अमृत गौरव समिती महाराष्ट्र राज्याचे सदस्य प्रमोद सूर्यवंशी, सर्जेराव पाटील, रमेश मारुती पाटील, लेखक आणि साहित्यिक समूह, कोल्हापूर यांनी केले होते. याशिवाय, बी.पी.ई. सोसायटी नाईट हायस्कूल, बांद्रा आणि राज्यभरातील मान्यवर साहित्यिक व रसिक मंडळींची मोठी उपस्थिती होती.

डॉ. प्रविण डुंबरे

रणजित पवार

युवराज्ञी सोनवणे
शिवजन्मभूमीतील ओतूर पंचक्रोशीतील सहा साहित्यिकांना मिळालेल्या या सन्मानामुळे स्थानिक साहित्य क्षेत्रात उत्साहाचे वातावरण आहे. अशा कार्यक्रमांच्या माध्यमातून साहित्यिक योगदानाची दखल घेऊन त्यांना प्रोत्साहन मिळत आहे. प्रजासत्ताक अमृत गौरव पुरस्कार सोहळा हा साहित्यिकांसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
Comentários