मुळशी तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धेचे यशस्वी आयोजन
- Neel Writes
- Aug 18, 2024
- 2 min read
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, पुणे, मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघ, आणि हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल, कासार आंबोली तालुका मुळशी, जि. पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने मुळशी तालुका शालेय बुद्धिबळ स्पर्धा हेरिटेज इंटरनॅशनल स्कूल येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या स्पर्धेत 21 शाळांमधून 137 मुले आणि 70 मुली, एकूण 207 खेळाडूंनी सहभाग घेतला.
स्पर्धेचे उद्घाटन हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक संचालक श्री. कुणाल भिलारे यांच्या हस्ते करण्यात आले. त्याचप्रमाणे प्रशासकीय व्यवस्थापिका सौ. यशस्विनी भिलारे, हेरिटेज स्कूलच्या प्राचार्या सौ. रेणू पाटील, मुळशी तालुका क्रीडा शिक्षक संघाचे अध्यक्ष श्री. सुनिल सातव, उपाध्यक्ष श्री. संतोष बनकर, सचिव श्री. संदीप पवार, आणि राष्ट्रीय पंच श्री. पवन कातकाडे यांची उपस्थिती होती.
प्रमुख अतिथी म्हणून बोलताना श्री. कुणाल भिलारे यांनी ग्रामीण भागातील खेळाडूंना योग्य सुविधा मिळाल्यास ते आंतरराष्ट्रीय पातळीवर नक्कीच चमकतील असे सांगून क्रीडा संस्कृती रुजवण्याचे महत्त्व अधोरेखित केले.
या स्पर्धेचे आयोजन हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलच्या प्राचार्या सौ. रेणू पाटील, सैनिकी शाळेचे पर्यवेक्षक श्री. संदीप पवार, श्री. करण घोलप, आणि हेरिटेज स्कूलचे शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी केले.
या स्पर्धेच्या माध्यमातून जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी खेळाडूंची निवड करण्यात आली असून त्यांची यादी खालीलप्रमाणे आहे:
1. 14 वर्षांखालील मुली: सान्वी कपूर, झोया झरीना, राजनंदिनी मंगरूळे, समृद्धी मक्तेदार, नाव्या सुपेडा
2. 17 वर्षांखालील मुली: सानवी साळुंके, अन्वेषा नाईक, सुरभी दुखंडे, अनुष्का देशमुख, कार्तिकी आल्हाट
3. 19 वर्षांखालील मुली: सिद्धी कळमकर, मनाली जाधव, गौरी आहेर, श्रुतिका भोसले, सायली गालवे
4. 14 वर्षांखालील मुले: अभिजय वाळवेकर, सोहम राऊत, अनिरुद्ध वडणगेकर, सार्थक इनामदार, अद्विक वर्मा
5. 17 वर्षांखालील मुले: अर्चित देशपांडे, ईशान जांडू, शिव व्यास, सौरीक खालकर, शौर्य गोरे
6. 19 वर्षांखालील मुले: अर्जुन आठल्ये, आरव शहा, परम कक्कड, आर्चीस्मान वडणगेकर, अग्निवा घोषाल
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. संदीप पवार यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्राचार्या सौ. रेणू पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. सुषमा पाटील यांनी केले. शालेय व्यवस्थापन सदस्य, संस्थापक अध्यक्ष श्री. कृष्णा भिलारे आणि सचिव सौ. संगीता भिलारे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या कौशल्याचा उत्कृष्ट प्रदर्शन ठरली आणि हेरिटेज इंटरनॅशनल स्कूलने तालुक्यातील क्रीडा क्षेत्रातील विद्यार्थ्यांना एक सशक्त व्यासपीठ प्रदान केले आहे.
Comments