top of page

घर , बंदूक , बिर्याणी - ऍक्टशन , ड्रामा , आणि दर्जेदार स्टोरी

नागराज मंजुळे , सयाजी शिंदे आणि आकाश ठोसर असे उत्तम कलाकार एका चित्रपटात असल्यावर , चित्रपट हा उत्तमच असणार. आणि ती इच्छा ह्या त्रिकुटाने पूर्ण केली आहे.

घर बंदूक बिर्याणी हा चित्रपट , चित्रपटगृहात आला असून प्रेक्षक नक्कीच चांगला प्रतिसाद देत आहेत. मुख्य म्हणजे नागराज मंजुळे ह्या चित्रपट मध्ये कलाकार म्हणून काम करत आहेत. . सस्पेन्स, ड्रम, थ्रिल, रोमांस असा मसाला चित्रपट , मराठी मध्ये होत आहे , ह्याचे कौतुक करावे तितके कमी.




चित्रपटामध्ये एक हिरो असतो , आणि एक व्हिलन , असाच स्वरूप घेत , सयाजी शिंदे ह्यांनी व्हिलन ची भूमिका केली आहे , जी कि उत्तमरित्या स्क्रीन वर झळकती आहे. व्हिलन हा थोडा क्रूर मनाचा किव्हा बदल्याची भावना मनामध्ये घेऊन हिरो ला त्रास देतो असतो , हा खूप साधा नियम म्हणता येईल , तीच पद्धत वापरून , व्हिलन आपल्या "राया" इन्स्पेक्टर ला ठार करायचा निर्धार करत , पोलीस दला वर हल्ला करायचा प्लॅन करतो , आणि त्या मध्ये बिर्याणी चा भाग कसा येतो , आणि हे मिशन पार पडत का ? ह्या वर सगळं चित्रपट आहे.


चित्रपटाची सिनेमॅटोग्राफी उत्तम आहे , आणि पठकथा हि जलद स्वरूपात दाखवण्यात आली आहे. हिरो आहे म्हणल्यावर हेरॉईन असल्याच हवी. सायली पाटील ने लक्ष्मी ची भूमिका केली आहे , जी एक खूप साधी सरळ आहे. जिचं राजू ( आकाश ठोसर ) वर प्रेम आहे .


नागराज मंजुळे हे आपल्याला अभिनय करताना दिसत आहेत , व त्याने इनस्पेक्टर ची भूमिका चोख केली आहे. एक रांगडा , धडाकेबाज इन्स्पेक्टर जो गुहनगरांना शिक्षा करतो तसेच जनतेला विश्वास. सयाजी शिंदे ( पल्लम ) ह्यांचे कॉमेडी टाईमिंग उत्तम असल्या मुले , चित्रपटामध्ये कॉमेडी चा एक औंष दिसायला मिळतो.



चित्रपटातले ड्रोन शॉट्स दर्जेदार आहेत, आणि कॉमेडी ला आपण हसू शकतो, हि काळजी दिग्दर्शकाने घेतली आहे. हा चित्रपट हा हेमंत अवताडे ह्यांनी दिग्दर्शित केला अजून क्रीटीव्ह दिग्दर्शक हे नागराज मंजुळे आहेत.


चित्रपटाची शेवटाची १५ मिनिटे महत्वाची असून , त्यात च सगळी कथा बदलते ,जी कि सादरीकरणात हवा करून जाते.

बाकी कलाकारांची भूमिका मस्त झाली आहे. दीप्ती देवी च काम खूप दिवसानी बघायला मिळाले.


आकाश ठोसर हा एक रसोईया दाखवला असून त्याने बनवलेली बिर्याणी ह्या नक्षलवादी आणि पोलीस ह्यांचा मध्ये कशी येते , हे पाहण्यासारखे आहे .

चित्रपटामधली एकाद गाणं नसत तरी चालून गेले असत , पण गाणी गाजणार हे नक्की.


झी स्टुडिओस आणि आटपाट प्रोडक्टशन्स ह्यांनी उत्तम साथ देत , निर्मिती केली आहे. IMDb रेटिंग ८.२/१० एवढं आहे . चित्रपट लांबच्या आणि जवळच्या चित्रपटगृहात लागला आहे . जरूर बघा.



Comments

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating

©2025 Neel Writes | All Rights Reserved

bottom of page