top of page

Mrs. Rohini Ghongade to be awarded by Lagori on Womens Day




नमस्कार,

मी सौ. रोहिणी शशिकांत घोंगडे . वय 40 . मोठा मुलगा Bcom 1 st yr + CS module 1 शिक्षण घेत आहे तर छोटा 8 th मध्ये आहे.

लग्नानंतर मी एका कर्तव्यदक्ष गृहिणीची जबाबदारी अगदी जबाबदारीने पार पाडत आहे . एकत्र कुटुंब असल्याने मुले, घरातील मंडळी सगळ्यांना सांभाळून काहीतरी करण्याची, स्वतःचि ओळख निर्माण करण्याची एक सुप्त इच्छा होती. स्वयंपाक , मेहंदी, शिवणकाम ( stiching) , पेंटिंग (painting) , नृत्य , अ‍ॅक्टींग (acting) , या सर्व कलांमधे पारंगत असताना, शिक्षण पूर्ण असताना देखील काय करावे ते सुचत नव्हते. मृगाला जसे स्वतः जवळ असलेल्या कस्तुरीची जाणीव नसते, तसेच काहीसे माझे झाले होते. प्रयत्न खूप होते पण मार्ग सापडत नव्हता.


करोना मधील लॉक डाऊन ने मात्र माझ्यातील कस्तुरीचि जाणीव करून दिली. माझ्या दोन्ही मुलांनी cooking videos बनवायला आणि एडिटींग करायला शिकवले. त्यातूनच "Madhur Vyanjanam " नावाचे YouTube cooking channel सुरू केले. स्वतः ला असलेली स्वयंपाकाची आवड, माहेरी - आज्जी ,आई ,काकू यांच्याकडून शिकलेले पदार्थ, सासरी सासुबाई आणि काकूंकडून शिकलेले पदार्थ, माझ्या नवर्‍याकडून असलेला पाठिंबा, या सर्वांचा खूप फायदा झाला. चॅनल मुळे भरपूर orders येऊ लागले. केक, चॉकलेट, Ice cream ,veg food मध्ये snacks, दिवाळी फराळाचे पदार्थ ,पुरण पोळी,उकडीचे मोदक, जेवणाचे orders भरपूर प्रमाणात येऊ लागले.

अशातच माझी ओळख सौ. अनुश्री भागवत यांच्याशी झाली आणि त्यांनी मला लगोरी ग्रुप मध्ये सामावून घेतले. त्यांचे प्रोत्साहन हे माझ्यासाठी खूपच खास आहे. लगोरी ने आयोजित केलेल्या विविध उपक्रमांमधून एक वेगळा अनुभव आणि आत्मविश्वास मिळाला.

माझ्यातील पाक कलेचे घरातील मंडळींना, नातेवाईकांना कौतुक होतेच, पण आता मी केलेल्या चविष्ट पदार्थांचे कौतुक जेव्हा ग्राहक करतात तेव्हा पाठीवर शाबासकीची थाप मिळाल्याची अनुभुती येते. या कौतुकातून मिळणारे समाधान हे त्यातून मिळणार्‍या पैशांपेक्षा कितीतरी मोठे आहे. आणि हेच माझे प्रेरणास्थान ठरत आहे.

"Madhur Vyanjanam " आणि माझ्या यशामध्ये जितका वाटा माझ्या घरातील नातेवाईकांचा आहे तितकाच किंबहुना त्यापेक्षा जास्त लगोरी ग्रुपचा आहे. यासाठी सौ. अनुश्री भागवत यांना मनापासून धन्यवाद व ग्रुप मधील इतर महिला उद्योजिका यांना देखील त्यांच्या भावी यशासाठी खूप खूप शुभेच्छा.

धन्यवाद ....


Brand Name - "Madhur Vyanjanam "

Accepts Homemade Veg Food Orders.

Specialities - दिवाळी फराळ , पुरण पोळी ,उकडीचे मोदक , उखळात कुटलेलि शेंगा चटणी , orders for small parties.

Contact -

Mrs. Rohini S.Ghongade.(Pune)

8857812234

1 comentário

Avaliado com 0 de 5 estrelas.
Ainda sem avaliações

Adicione uma avaliação
panche.amar
02 de mar. de 2023
Avaliado com 5 de 5 estrelas.

Kesp it up 😇😇

Curtir

©2025 Neel Writes | All Rights Reserved

bottom of page