top of page

Mrs. Pallavi Chawardol to get Award on Women's Day by Lagori




माझे नाव पल्लवी चावरडोल , वय 40... By profession मी एक फिटनेस ट्रेनर आणि dietician.


2007 ला चिंचवड ला पहिल्यादा लग्न करून आले. नुकतेच

M. Sc झाले होते. B. Ed चा result लागण्याआधी लग्न ठरले होते.

इथे चिंचवड ला आल्यानंतर खूप एकटेपणा जाणवत होता. प्रत्येक गोष्टीसाठी यांना पैसे मागणे पटत नव्हते.

नवीन जगा,लोक नवीन कुठे कोणाची ओळख नाही. तरी सुध्या जॉब apply करत होती.

2007 ला मी इंजिनीरिंग कॉलेज ला जॉईन केले. अगदी 5 हजारावर सुरुवात. याची खूप मदत होती.चिंचवड ते सुदुंबरे असा रोजचा प्रवास. आमचे हे खूप मदत करत

पण कडक पण इतकेच तु एकटीने जायचे सर्वे हॅन्डल करायचे.. मी नाही येणार कुठे. पण यामुळेच कदाचित माझी हिम्मत वाढली.

बोलका स्वभाव असल्याने खूप ओळख झाली.

कॉलेज पण काही दिवसात बदलले. एक अनुभव घेऊन नवीन सुरुवात केली.

घराजवळ चे कॉलेज पहिले कारण मुलगी लहान.असेच दिवस जात होते.

3 वर्ष्याच्या अंतराने दुसरी मुलगी झाली. मग मात्र सर्वे हॅन्डल करणे कठीण होत होते.

कमी वयात खूप हेअल्थ issues झालेत. एकच कारण स्ट्रेस.

माझे थायरॉईड अचानक खूप वाढले. स्पॉईडलिसिस झाला होता. हातापायला मुंग्या यायच्या. त्यामुळं झोप नाही व्हायची. सर्वा राग मुलींवर काढ्याची.

घरातलं वातावरण खराब झाले होते

दिवसभर मुली पाळणा घर. सोबत माझी धावपळ होत होती.


अश्यातच वजन अचानक वाढू लागले.

शारीरिक ताकद कमी पडत होती.

खूप दमून ज्यायचे. दोन मुली, घराचे काम, कॉलेज यामुळे आपण नक्की जीवन जगात आहो का प्रश्न पडायचा.


एका मैत्रिणी ने एक सेंटर सुचविले. पण वजन कमी करायचे म्हणजे डाएट आला. स्वतः साठी वेळ काढून सर्वे होणार का. पण स्वतःची लाज वाटू लागली. मुली सुध्या बोलू लागल्या आई तु खूप ढोली झाली.

आणि मग ठरविले कि आता करायचे.

मी तीन महिन्यात 10 किलो वजन कमी केले. हळू हळू सर्वे आजार कमी झाले.

सर्वे दुखणे मी विसरून गेले होते. नवीन आयुष्य मिळाले मला.

रोज प्रसन्न राहू लागले. छान कॉम्प्लिमेंट मिळू लागले.

पण फॅमिली टाइम्स मिस करत होती.

मुली दिवसभर पाळणा घरात ठेवणे पटत न्हवते.

सुट्टी सुरु झाली आणि ठरविले ज्या गोष्टीमुळे आपल्याला नवीन जीवन मिळाले. असे किती तरी लोक आहेत जे वजन वाढीमुळे अनेक समस्याला पुढे जात आहे.

मी 14 वर्ष नौकरी केली पण त्यात समाधान न्हवते.

2018 ला मी नौकरी सोडली. पण तो पर्यंत मी माझी ओळख बनविली होती.

खूप लोकांना मदत करायची संधी मिळाली.2018 ला मी metabolix ची सुरुवात केली.

सोबत मी diatician चे काही कोर्सेस पण केले.

Social media मुळे अजून व्यवसायला मदत झाली.


अनेक कॉलेज, संस्था मध्ये मला आमंत्रण मिळू लागले.

Metabolix चिंचवड मध्ये दिवसेंदिवस वाढत होते.


यातच कोरोना आला. पण त्या काळात खचून न जाता ऑनलाईन पद्धतीने काम करायला सुरुवात केली. कोरोना पर्यंत फक्त pcmc ची लोक यायची. पण ऑनलाईन मुळे अनेक शहरातून, अनेक देश्यातून लोक जॉईन झालीत.कोरोनामुळे

आरोग्यबद्दल लोकांना जागृती मिळाली होती.

कोरोनामुळे व्यवसायला खूप मोठी सुरुवात मिळाली.

2021 मध्ये ,महिला दीना निमित्त रोटरी क्लब वाल्हेकर यांनी निर नारी अवॉर्ड साठी माझी निवड झाली.

हा अवॉर्ड माझ्या साठी खूप अनमोल होता. आपल्या कामाची कोणीतरी दाखल घेत यातच आनंद होता.


या नंतर अनेक कॉलेज, संस्था, कंपनी मध्ये मला आरोग्य बद्दल माहिती देण्यासाठी निमंत्रन येत राहिले.


या वर्षी आपला आवाज आपली सखी आयोजित राणी लक्ष्मी बाई 2022 या पुरस्काराने नामांकित केल्या गेले.


14 वर्ष नौकरी करून वयाचे 36 वर्षा मध्ये एक नवीन सुरवात केली. आज metabolix ला 5 वर्ष पूर्ण होतील.

खूप आनंद होतो आपल्याला ईश्वरा ने आयुष्यात समाज सेवा करायची संधी दिली आहे. आपल्या कार्यमुळे अनेक लोकांना नवीन आयुष्य मिळून देण्यात यशस्वी ठरलो.


खूप लोकांचे आशीर्वाद घेऊनच metabolix समाजात उंच भरारी घेण्यात तयार आहे.


एक आई, एक बायको, एक हेअल्थ कोच म्हणून मी माझ्या पद्धतीने जीवन जगत आहे यातच खूप समाधान.

धन्यवाद 🙏

1 Comment

Rated 0 out of 5 stars.
No ratings yet

Add a rating
priyankathakre05
Feb 27, 2023
Rated 5 out of 5 stars.

Congratulations

Like

©2025 Neel Writes | All Rights Reserved

bottom of page